जर तुम्ही एक Upstox चे वापरकर्ते असाल आणि ‘Upstox चे शुल्क (Upstox AMC Charges) कसे कमी करावे?’ किंवा ‘दलाली व्यतिरिक्त विनाकारण चे शुल्क कसे टाळावे?’ ही माहिती शोधत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे.

व्यापारी (Trader) किंवा गुंतवणूकदार (Investor) या नात्याने आपण भरपूर गोष्टींचा सामना करत असतो. ज्यात Stock Market मध्ये ट्रेड करत असताना आपल्याला Brokerage व इतर खर्च निघून वर नफा कसा प्राप्त होईल याकडे लक्ष ठेवत अनिश्चिततेचा उलाढाल करत असतो. पण मागील reports ची पडताळणी केली असता आपल्याला त्याबद्दलची वास्तविकता लक्षात येते.

साधारणतः आपण ब्रोकरेजेस पेक्षा (दलाली पेक्षा) इतर चार्जेस साठी जास्त पैसे देतो आणि जर आपण ही संख्या तपासून पाहिली तर पहिल्याच पडताळणी मध्ये आपल्याला ती संख्या धक्कादायक दिसेल. ती सर्व संख्या ही ब्रोकरेजेस कॉस्टच्या ऐवजी इतर शुल्क जसे चार्जेस, फीस, ड्युटीज, कर (टॅक्स) आणि उपकर (cess) हे सर्व आपण देत असतो.

जर तुम्ही तुमच्या ब्रोकरशी सल्लामसलत केलात तर असे क्वचितच ब्रोकर्स असतील जे तुम्हाला अनिवार्य (Mandatory) आणि विना-अनिवार्य (Non-mandatory) खर्चाबद्दल तुम्हाला माहिती देतील आणि ते विना-अनिवार्य (Non-Mandatory) खर्च कमी करण्याचे मार्गदर्शन करतील.

पण, तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही. कोणत्याही नियमांचा भंग नं करता सर्व नियमांच्या अधीन राहून मोफत BSDA conversion या पद्धतीचा वापर करून तुमच्या सध्याच्या trading style वर कोणताही परिणाम पडू न देता तुम्हास भेडसावणारा विना-अनिवार्य (Non-mandatory) खर्च कमी करण्याची पद्धत या लेखात सांगणार आहे. पण त्या अगोदर Trading आणि Demat account शी निगडीत असणाऱ्या सर्व खर्च व शुल्काबद्दल माहिती घेऊया.

पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला या खात्यांमधील फरक माहिती नसेल तर ते पटकन जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा. Difference between Trading and Demat account. हे आर्टिकल लवकरच मराठीत उपलब्ध होईल.


कळत नकळत Stock Market मध्ये trade करण्यासाठी Trading आणि Demat account असे दोन्ही account आपण open करतो. म्हणजे आपण या दोन्ही खात्यांसाठी पैसे मोजत असतो. ते खर्च २ प्रकारे देण्यात येतात. पहिल्या प्रकारात आपण जेव्हा काही transaction (trade) करतो तेव्हा आणि दुसऱ्या प्रकारात दर महिना / वर्षाला लागणार खर्च त्यालाच आपण MMC / AMC म्हणजे Monthly Maintenance Charge किंवा Annural (वार्षिक) Maintenance Charge असे म्हणतोत. (येथे Upstox AMC charges / MMC Charges).

Trading Account चे खर्च

Transaction वर

 • Brokerage commission charges
 • STT/CTT (Securities / Commodities)
 • IGST (Or CGST and SGST)
 • Exchange Transaction Charges
 • Clearing Charges
 • SEBI Fees
 • Stamp Duty

Maintenance साठी

 • आनंदाची गोष्ट म्हणजे Trading account च्या Maintenance साठी upstox एकही रुपये आपल्याकडून घेत नाही. पण काही ब्रोकर charge करू शकतात.

Demat Account चे खर्च

Transaction वर

 • Delivery Holding Charges (DHC) applicable for selling side + GST + Cess

Maintenance साठी

 • Annual / Monthly Maintenance Charges (AMC or MMC) – Non-Mandatory charges. नियमात असाल तर हे खर्च आपण कमी करू शकतोत. हा लेख याचसाठी आहे.

कोणते चार्जेस टाळता येतील?

According to the SEBI’s Press Release No. 79/2012 dated 27th August 2012 small investors need not pay charges towards Demat Account maintenance. In Upstox case you can avoid Rs. 25 + GST if you fulfil following important conditions.

दिनांक 27 ऑगस्ट 2012 रोजी SEBI च्या Press Release क्र. 79/2012 च्या अनुषंगाने छोट्या गुंतवणूकदारांना Demat account maintenance साठी charges देण्याची गरज नाही. जर तुम्ही खालील अटींमध्ये बसत असाल तर तर Upstox च्या Demat AMC साठी लागणारे मासिक शुल्क ₹ 25 + GST तुम्ही वाचवू शकता.

 1. आपल्याकडे इतर कोणताही डिमॅट अकाउंट नसावा.
 2. इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू ₹ 50,000 पेक्षा कमी असल्यास AMC मोफत.
 3. इन्व्हेस्टमेंट जर ₹ 50,001 ते ₹ 2,00,000 च्या दरम्यान असेल तर Demat AMC साठी ₹100 असतील.

डिमॅट खात्याचे मेंटेनन्स चार्जेस कमी करण्यासाठी वरील criteria मध्ये आपला account असणे गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी SEBI चा संबंधित Press Release या लिंक वर क्लिक करून वाचावा.

Upstox AMC charges / MMC charges टाळण्यासाठी घायवायची पाऊले (Steps)

खालील पाऊले उचलून तुमचा regular demat Account हा Basic Services Demat Account (BSDA) मध्ये convert करू शकता.

पहिले पाऊल : खालील form डाऊनलोड आणि प्रिंट करणे

दुसरे पाऊल : आवश्यक माहिती भरणे

 • दिनांक: आजची दिनांक लिहा
 • Demat Client ID : RKSV किंवा Upstox ने दिलेले १८ अंकांचे डिमॅट A/c नंबर मिळवा व त्यापैकी पहिले ८ अंक अगोदारपासूनच आहेत. त्यापुढील ८ अंक लिहा. जर माहिती नसेल तर upstox च्या My Profile Section मधून मिळवू शकता. किंवा येथे क्लिक करून upstox च्या support team ला विचारू शकता.
 • नाव व PAN कार्ड नंबर प्रविष्ट करून संबंधित खातेदाराने सही करावी.

तिसरे पाऊल : Upstox च्या खालील पत्त्यावर अर्ज पाठवा

RKSV Securities India Private Limited

Salasar Business Park,

Off 150 Feet Flyover Road,

Bhayandar West, Thane – 401101,

Maharashtra

Upstox address to courier documents

तुमचे documents मिळाले आणि कार्यवाहीची पुढील प्रक्रिया सुरुवात झाली असल्याचा confirmation असलेला ईमेल user च्या registered ईमेल ID वर upstox कडून पाठवण्यात येईल.

सर्व आवश्यक गोष्टींची पडताळणी केल्यावर तुमचा Demat खाते BSDA (Basic Service Demat Account) च्या type मध्ये convert झाल्याचा ईमेल येईल. आणि येथे आपले सर्व काम झालेले आहे असे समजावे. जर नाही आल्यास upstox सोबत संपर्कात राहून संबंधित माहिती मिळवून घ्यावी.


BSDA संबंधित काही FAQ’s (Frequently Asked Questions)

मी Intra-day मध्ये भरपूर ट्रेड करतो. तरी मी याचा लाभ घेऊ शकतो का?

होय. आपणही याचा फायदा घेऊ शकता कारण सर्व निकष (conditions/criterias) हे Delivery Holding Value शी निगडीत आहेत. म्हणून, कोणतीही चिंता न करता आपण Intra-Day मध्ये ट्रेड करू इच्छिता त्यासाठी capital ठेवण्यावर कसलेही निर्बंध लागू नाहीत. उदाहरणार्थ, तुमच्याकडे ₹ 35 हजारांची holding आहे आणि तुम्ही ₹ 5 लाखाच्या भांडवल वापरुन Intra-Day trade करत आहात असे असेल तरी आपण BSDA च्या सर्व निकषांचे पालन करत आहात म्हणून तुम्ही याचा फायदा करून घेऊ शकाल.

माझ्याकडे अनेक non-BSDA डिमॅट अकाउंट्स आहेत, तर मी माझे काही डिमॅट अकाउंट्स BSDA मध्ये रूपांतरित करू शकतो का?

SEBI च्या P. R. No. 79/2012 च्या अस्पष्टतेमुळे हे सांगता येणार नाही की ते नवीन डिमॅट अकाउंट ओपनरसाठी (भारतामध्ये डिमॅट अकाउंट अस्तित्वात नसलेले) लागू असेल की नवीन BSDA अकाउंट होल्डरसाठी (भारतामध्ये डिमॅट अकाउंट अस्तित्वात असलेले) लागू असेल, हे अद्याप अस्पष्ट आहे. परंतु असे बरेच लोक आहेत जे त्यांचे अनेक डिमॅट अकाउंट्स असतानादेखील त्यांचे खाते BSDA मध्ये यशस्वीरित्या रुपांतरीत केलेले आहेत. जर तुमचा ब्रोकर तुम्हाला विचारत असेल, तर त्यांना हे सांगायला विसरू नका की हे तुमचे एकमेव BSDA खाते असेल. आपण आपले डीमॅट खाते BSDA मध्ये रूपांतरित करण्याची विनंती केल्यास, स्वीकारणे किंवा नाकारणे हे कायदेशीर कार्यसंघावर अवलंबून आहे. परंतु BSDA मध्ये रुपांतर करण्यासाठी अर्ज करणे फायदेशीर ठरेल.

एकापेक्षा जास्त डीमॅट अकाउंट्स राखल्यामुळे माझा अर्ज नाकारला गेला तर?

आपण या परिस्थितीचा सामना करत असल्यास एएमसी / एमएमसी शुल्क टाळण्यासाठी आपल्याकडे एकच पर्याय असेल. ते म्हणजे, आपण गुंतवणूकीच्या उद्देशाने वापरत नसलेले डीमॅट अकाउंट्स बंद करुन आपले बाकी ट्रेडिंग अकाउंट्स ठेवा आणि कोणत्याही सक्रिय डीमॅट अकाउंटला लिंक करा. उदाहरणार्थ, आपल्याकडे A1 आणि A2 अशी दोन ट्रेडिंग अकाउंट्स आहेत आणि ते D1 आणि D2 ह्या डीमॅट अकाउंट्स ला अनुक्रमे जोडलेली आहेत. आपण फक्त एक डीमॅट अकाउंट (D1) ठेवून दोन्ही ट्रेडिंग अकाउंट्स (A1 आणि A2) वापरू शकता. आपल्याला फक्त D2 डीमॅट अकाउंट बंद करण्याची विनंती करावी लागेल आणि D1 डिमॅट अकाउंट A2 ट्रेडिंग अकाउंटला जोडावे लागेल.


इतर दुवे (References) :


जर हा लेख आपणास महत्वपूर्ण वाटला तर खाली comment करून आपला अभिप्राय नोंदवा. तसेच तुमच्या ट्रेडर friends सोबत हा लेख share करण्यास विसरू नका.

thank you signage
Photo by Giftpundits.com on Pexels.com